#रामदास आठवले

Showing of 521 - 534 from 535 results
पप्पू कलानी तिसर्‍या आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

बातम्याAug 31, 2009

पप्पू कलानी तिसर्‍या आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवणार

31 ऑगस्टराज्यात नव्यानेच स्थापन झालेल्या तिसर्‍या आघाडीत पुन्हा मतभेद होण्याची शक्यता दिसत आहे. 'उल्हासनगरचा डॉन' अशी ओळख असणारे सुरेश बुधरमल कलानी उर्फ पप्पू कलानी तिसर्‍या आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली. कलानी रिपब्लिकन पक्षाच्या कोट्यातून लढतील असंही आठवले यांनी स्पष्ट केलं. मात्र यावरुन तिसर्‍या आघाडीत मतभेद होऊ शकतात. कारण नुकताच हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवारीलाही विरोध झाला होता. विशेष म्हणजे या घोषणेमुळं खुद्द पप्पू कलानींच्याही घरात अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या पत्नी ज्योती कलानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आहेत. सध्या तिसर्‍या आघाडीत असणारे आमदार कपील पाटील यांच्या लोकभारती पक्षानं कलानींना महापालिकेच्या सत्तेतून हद्दपार केलं होतं. त्यामुळं आठवलेंच्या निर्णयामुळं त्यांच्या पक्षातही अस्वस्थता पसरली आहे.

Live TV

News18 Lokmat
close