#रामटेक

Showing of 183 - 186 from 186 results
नागपूरच्या 9 लाख मतदारांना ओळखपत्र नाही

बातम्याMar 7, 2009

नागपूरच्या 9 लाख मतदारांना ओळखपत्र नाही

7 मार्च, नागपूर प्रशांत कोरटकरनिवडणुकीत बोगस मतदान होवू नये यासाठी नागपूरमध्ये वर्षभर मतदार ओळखपत्र वाटपाची मोहीम सुरू होती. पण अजूनही जिल्ह्यात सुमारे नऊ लाख मतदारांना हे ओळखपत्र मिळालेलं नाही. नागपूर शहराच्या मध्यभागी राहणारे प्रमोद भागवत गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत मतदान करतायत. पण यावेळी त्यांच्याकडं मतदार ओळखपत्र नाहीये. ओळख पत्र तयार करण्याचं काम सुरू होतं, तेव्हा भागवतांकडं वेळ नव्हता. आणि आता त्यांच्यावर ओळखपत्रासाठी सरकारी ऑफिसमध्ये हेलपाटे मारायची वेळ आलीय.2004 च्या निवडणुकांनंतर हे मतदार ओळख पत्रं बनवण्याचं काम सुरू होतं. पण वाढणारे मतदार आणि संथगतीनं चालणारं सरकारी काम यामुळं आजही किमान 9 लाख लोक या ओळखपत्रापासून वंचीत आहेत.नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक आणि नागपूर या मतदारसंघांमध्ये 2004 च्या निवडणुकीत 20 लाख लोकांकडे मतदार ओळख पत्र नव्हतं. हा आकडा आता कमी झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे, तशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी सांगितली. ओळखपत्र नव्हतं त्यावेळी बोगस मतदानाचं प्रमाण मोठं होतं. अजूनही या ओळखपत्राअभावी बोगस मतदानाची शक्यता नाकारता येत नाही.