Elec-widget

#राधिका

कॅन्सरवर मात केल्यानंतर  इरफानचं चाहत्यांनी असं केलं स्वागत, VIDEO व्हायरल

मनोरंजनApr 11, 2019

कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफानचं चाहत्यांनी असं केलं स्वागत, VIDEO व्हायरल

11 एप्रिल : अभिनेता इरफान खान न्यूरो एंड्रोक्राइन ट्यूमरमुळे मागील एक वर्ष बॉलिवूडपासून दूर होता. या आजाराबाबत स्वतः इरफाननं ट्विटर वरून माहिती दिली होती. न्यूरो एंड्रोक्राइन हा एक प्रकारचा कॅन्सर असून इरफान मागील एक वर्ष त्यावर लंडनमध्ये उपचार घेत होता. या आजारातून पूर्णपणे बरा होऊन नुकताच तो भारतात परतला असून त्यानं 'अंग्रेजी मीडियम' सिनेमाचं शूटिंगही सुरू केलं आहे. यावेळचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये इमरान चाहत्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या सिनेमामध्ये इरफान मिस्टर चंपकजी ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त राधिका मदन इरफानच्या मुलीची भूमिकेत असणार आहे. तर करीना कपूरचं नाव इरफानच्या पत्नीच्या भूमिकेसाठी घेतलं जात आहे मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.