मुंबई, 7 जानेवारी : साहित्य संमेलन आणि वाद दरवर्षी हातात हात घालून येतात. यंदाही यवतमाळमध्ये होणाऱ्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनात हे समीकरण अबाधित आहे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी लेखिका म्हणून विरोध केला आणि आयोजकांनी थेट सहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतलं. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल यांना दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यामुळे एकच काहूर उठलं असून, सरकारवर चहुबाजूंनी टीकेचा भडीमार सुरु झाला आहे. यानंतर कलाकार आणि साहित्यप्रेमी राज ठाकरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत चूक मान्य केली. पाहूयात यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...