#राज ठाकरे

Showing of 1431 - 1436 from 1436 results
नानांनी माहित नसलेल्या गोष्टीत लक्ष घालू नये - राज ठाकरे

बातम्याSep 8, 2011

नानांनी माहित नसलेल्या गोष्टीत लक्ष घालू नये - राज ठाकरे

07 सप्टेंबरउद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, तमाम मराठी लोकांसाठी हे दोन पक्ष लढत आहे आता त्यांनी एकत्र यावे अशी माझ्यासह सर्व मराठी जणांची आहे असा सल्ला नाना पाटेकर यांनी दिला होता. नानांचा हा सल्ला राज ठाकरे यांना पटला नाही. राज यांनी थेट आपल्या शैलीत नानांना उत्तर दिलं. नानानं माहिती नसलेल्या गोष्टीत नाक खुपसू नये असा प्रतिटोला राजने मारला होता. गणेशोत्सवानिमित्त मनसेच्यावतीने कार्यक्रमात अभिनेता नाना पाटेकर यांची प्रगट मुलाखत आयोजित केली होती. मनसे आमदार शिरीष पारकर यांनी ही मुलाखत घेतली होती. दरम्यान आज संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकत राज ठाकरेंनी आज नानाच्या घरी भेट दिली. भेटीनंतर बोलताना नेहमीच नानांच्या गणपतीच्या दर्शनाला येतो. वाद गैरसमज काहीच नाही असं स्पष्टीकरण राज यांनी केलं. नानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, तशीच मीही माझी मतं व्यक्त केली असंही राज यांनी म्हटलं.

Live TV

News18 Lokmat
close