राजीनामा

Showing of 2302 - 2315 from 2896 results
मय्यप्पन यांच्यामुळे चेन्नई टीम अडचणीत

बातम्याMay 24, 2013

मय्यप्पन यांच्यामुळे चेन्नई टीम अडचणीत

मुंबई 24 मे : चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ गुरुनाथ मय्यप्पन यांना अटक झाल्यास बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राजीनामा देतील अशी शक्यता आहे तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज टीमचं भवितव्यही धोक्यात येऊ शकतं. आयपीएलच्या नियमावलीत टीमचा मालक अथवा सहमालक जर फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले तर सदरील टीम आयपीएलमधून बाहेर काढली जाईल अशी तरतूद आहे. या नियामवलीचा बीसीसीआय अभ्यास करत आहे. जर नियामवली प्रमाणे उल्लंघन केलं असेल तर चेन्नई टीम अडचणीत येवू शकते.बीसीसीआयने गुरूनाथ मय्यप्पन यांना जो पास दिला आहे त्या पासवर टीमचे सदस्य आणि मालक अशी नोंद आहे. त्यामुळे मय्यप्पन यांना टीमची ड्रेसिंग रूम सोडून स्टेडियममध्ये मॅच दरम्यान कुठेही जाणा-येण्याची मुभा होती. हा पास तत्कालिन आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनी जारी केला होता. एव्हान मय्यप्पन स्वत: आपण चेन्नई टीमचे सदस्य,एवीएम स्टुडिओ,एवीएम कंन्स्ट्रक्शनचे सीईओ असल्याचं सांगताय. तर चेन्नई सुपर किंग्ज टीमही इंडिया सिमेंट कंपनीच्या मालकीची आहे. मय्यप्पन हे टीमचे मालक तर नाहीच सीईओ सुद्धा नाही. ते फक्त टीमचे व्यवस्थापनाचे मानद सदस्य आहे. जर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मय्यप्पन दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू अशी स्पष्ट भूमिका इंडिया सिमेंट कंपनीने घेतली आहे. खरं तर बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांना आपल्या जावयावर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आणि कारणं सुद्धा आहे. आयपीएलच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे की, जर टीमचा मालक अथवा सहमालक फिक्सिंगमध्ये दोषी आढळले तर सदरील टीमला आयपीएलमधून बाहेर काढले जाईल. दुसरीकडे बीसीसीआयकडून सध्या यांसदर्भातल्या नियमावलीचा अभ्यास सुरु आहे. आयपीएलच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचल्यास बीसीसीआय चेन्नई टीमवर कारवाई करु शकते. सद्धा मय्यप्पन यांच्यावर फक्त आरोप करण्यात आले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. जर मय्यप्पन दोषी आढळले तर चेन्नई टीम अडचणीत येवू शकते.इंडिया सिमेंटचे पत्रगुरूनाथ मय्यप्पन हे टीमचे मालक तर नाहीच सीईओ सुद्धा नाही. ते फक्त टीमचे व्यवस्थापनाचे मानद सदस्य आहे. जर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मय्यप्पन दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू.-इंडिया सिमेंट कंपनीश्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा -राष्ट्रवादीमय्यप्पन यांना अटक झाली तर श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा आहे. श्रीनिवासन यांनी नैतिक पातळीवर राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. नवी दिल्लीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष असताना स्पॉट फिक्सिंगचे प्रकार कधीही घडले नाहीत असा टोलाही त्रिपाठींना लगावला. हैदराबादमधून बुकीला अटकतर दुसरीकडे बुकींना अटक करण्याचं सत्र सुरुच आहे. दिल्ली पोलिसांनी मोहम्मद याह्या या बुकीला हैदराबाद इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक केली. मोहम्मद आज पहाटे दुबईला जाणार्‍या विमानात बसण्याच्या तयारीत असताना त्याला पकडण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. आयपीएलमधल्या सट्टेबाजांच्या रॅकेटशी मोहम्मद याचे संबंध असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. मोहम्मद याह्या हा बुकी चंद्रेश पटेलच्या संपर्कात होता. मोहम्मद हा 1984 ते 2010 या कालावधीत मुंबई फिल्म इंडस्ट्रीत स्पॉट बॉय म्हणून काम करत होता.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading