#राजनाथ सिंह

Showing of 482 - 495 from 501 results
भाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रMay 14, 2013

भाजप प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस

11 एप्रिलनवी दिल्ली : भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करण्यात आली. काही वेळापूर्वीच पक्षाच्या नेतृत्वानं नवी दिल्लीत तशी घोषणा केली. मुंडे-गडकरी वादामध्ये प्रदेशाध्यपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडल्याचं मानलं जातंय. गेल्या काही काळापासून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले असताना, प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे त्यांनी सांगितलं होतं. प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यासाठी काल नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि सरचिटणीस यांची बैठक झाली होती.