देवरिया, 17 फेब्रुवारी: पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातील विजय मौर्य यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मौर्य यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव उपस्थित होते. विजय यांची पत्नी लक्ष्मी यांनी पतीला एकदा पाहण्याचा आग्रह केला. त्याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या गावाला येण्याचा हट्ट धरला. जर मुख्यमंत्री आपल्या घरी आले नाही तर मुलीसह आत्महत्या करू असा इशारा लक्ष्मी यांनी दिला. लक्ष्मी यांच्या हट्टासमोर सर्वांनीच हात टेकले अखेर मुख्यमंत्र्यांनी फोनवरून कुटुंबियांशी चर्चा केली. अर्थात मुख्यमंत्र्यांच्या फोनवरुन देखील लक्ष्मी यांचे समाधन झाले नाही.