#यूपीए

Showing of 170 - 173 from 173 results
ममतांची घोषणा

बातम्याSep 18, 2012

ममतांची घोषणा

18 सप्टेंबरकाँग्रेस सरकारने आम्हाला न विचारता डिझेल दरवाढीचा निर्णय घेतला. असा प्रकार या अगोदरही झाला आमचा आदर ठेवला जात नाही. आम्ही आजवर खूप सहन केलं आता बस्स...आमचे सगळे मंत्री आता राजीनामा देतील आम्ही यूपीए सरकारमधून बाहेर पडत आहोत अशी घोषणा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केली. पण काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा देणार का ? याबद्दल मात्र ममतांनी कोणताच निर्णय घेतला नाही. ममतादीदींच्या या निर्णयामुळे यूपीए सरकारला एकच झटका बसला आहे. डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडरवर मर्यादा आणि त्यापाठोपाठ एफडीआयचा निर्णय घेतल्यामुळे संतापलेल्या ममतादीदींनी सरकारवर एकच हल्लाबोल केला. सरकारला 72 तासांचा अल्टिमेटम देत दरवाढ मागे घ्या अन्यथा पाठिंबा काढून घेऊन असा इशारा दिला. आज 72 तासांचा अल्टिमेटम संपला आणि ममतांनी पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा काढत असल्याची घोषणा केली. काँग्रेस सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले नाही. जनतेवर अनेक निर्णय लादले गेले. दरवाढ,एफडीआयचा निर्णय आम्हाला न विचारता घेण्यात आला. एका सरकारमध्ये आम्ही असून सुध्दा आम्हाला विचारले जात नाही ही आमच्यासाठी अपमानाची बाब आहे. आम्ही आजवर खूप सहन केलं अनेक वेळा त्यांना याबद्दल जाणीव करुन दिली पण त्यांनी आमचा आदर राखला नाही. त्यामुळे अशा सरकारमधून आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी आमचे मंत्री राजीनामा देतील असं ममतांनी जाहीर केलं. ममतांच्या या निर्णयावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली. ममतादीदींनी जी घोषणा केली आहे ती केली. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. ममतांच्या मागण्यांवर आम्ही चर्चा करु अजुनही ममता आमच्या मीत्रच आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते जर्नादर द्विवेदी यांनी दिली.

Live TV

News18 Lokmat
close