#यवतमाळ

Showing of 1 - 14 from 37 results
VIDEO : अन् सरपंच चढले टॉवरवर...

व्हिडिओAug 30, 2018

VIDEO : अन् सरपंच चढले टॉवरवर...

यवतमाळ, 30 ऑगस्ट : जिल्ह्यातील लाडखेडच्या पोलीस ठाणेदाराने बेदम मारहाण केल्याच्या निषधार्थ चाणी गावचे सरपंच श्रावण राठोड चक्क टॉवर वर चढले आणि पोलिसांचा निषेध केला. राठोड यांनी टॉवरवर चढून ठाणेदारावर कारवाईची मागणी केलीय. गावात झालेल्या एका वादाची राठोड लाडखेड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र तक्रारीची दखल न घेता ठाणेदाराने उलट राठोडलाच पट्ट्यानं बेदम मारहाण केली, असा आरोप राठोड यांनी केलाय. माहिती मिळताच दारव्ह्याचे वरिष्ठ अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी श्रावण यांची समजूत काढली. मात्र ठाणेदारावर कारवाई झाल्याशिवाय खाली न उतरण्याचा त्यांनी पवित्रा घेतला. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

Live TV

News18 Lokmat
close