मोर्चा Videos in Marathi

Showing of 53 - 66 from 267 results
VIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर

बातम्याAug 7, 2018

VIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर

पंढरपूर, 07 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर मधील शालेय चिमुकल्यांनी शाळेला दांडी मारून श्री विठ्ठल रखुमाईला साकडे घातले. शालेय पोशाखात मंदिरामध्ये दाखल झालेल्या शेकडो चिमुरड्या विद्यार्थ्यांनी आपल्या गळ्यामध्ये टाळ घालून आरक्षणाच्या मागणी बाबत संत नामदेव पायरी समोर घोषणाबाजी केली. शालेय बालकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले हे अनोखे आंदोलन पहिलेच असावे. शाळकरी चिमुकल्याचे साकडे आंदोलन पाहून श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आलेले वारकरी मोठ्या आश्चर्याने या छोटया आंदोलकांकडे पहात होते.