#मोर्चा

Showing of 14 - 27 from 261 results
VIDEO: औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

बातम्याJun 26, 2019

VIDEO: औरंगाबादमध्ये विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा अर्धनग्न मोर्चा

औरंगाबाद, 26 जून: राज्य सरकारचं महापोर्टल बंद करण्यात यावं आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी औरंगाबादेत एक अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला. महापोर्टल ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून निवड समितीकडून ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी. पीएसआय पूर्व परीक्षा संयुक्त परीक्षेमधून वगळून स्वतंत्र घेण्यात यावी. एमपीएससीच्या वेळापत्रका सोबत जागांची आकडेवारी जाहीर करावी .उत्पादन शुल्क एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात .पोलीस भरतीचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे अशा अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता .या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.