#मोर्चा

Showing of 1119 - 1132 from 1465 results
पोलिसांना अतिआत्मविश्वास नडला - गृहमंत्री

बातम्याAug 31, 2012

पोलिसांना अतिआत्मविश्वास नडला - गृहमंत्री

31 ऑगस्ट11 ऑगस्टच्या हिंसाचाराअगोदर माझ्यासह पोलीस आणि गृहखात्याला अफवा पसरवल्या जात आहे याची पुर्ण माहिती होती. पण आझाद मैदानावर निघालेला मोर्चा असं काही करु शकतो याचा अंदाज मात्र चुकला. आम्ही खबरदारीही घेतली होती पण पोलिसांना अतिआत्मविश्वास याला नडला आणि हा सगळा प्रकार घडला अशी स्पष्ट कबुली राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आयबीएन लोकमतकडे दिली. सीएसटी हिंसाचारानंतर पहिल्यांदाच आर.आर.पाटील यांनी याप्रकरणावर सविस्तर खुलासा आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या मुलाखतीत केला. म्यानमार,आसाम, ब्रम्हा येथे झाल्या हिंसाचाराचे पडसाद राज्याच्या राजधानी मुंबईत पडू शकतात ही खरंच खेदाची बाब आहे. मुळात याबद्दल संपुर्ण भारतभर लोकांच्या भावना भडकवण्याचे काम एका गटाकडून झाले आहे. सोशलमीडिया,एसएमएस,एमएमएसच्या माध्यमातून याचे व्हिडिओ फुटेज देशभरात पसरवले गेले. पण हे सगळे व्हिडिओ बनावट होते. तिबेट, कुरात येथे झालेल्या भूकंपातील मृतदेह, गुजरात दंगलीत महिलांवर झालेल्याचे फुटेज वापरुन ती डब करुन देशभरात पसरवण्यात आली. याची माहिती माझ्यासह गृहखात्याला मिळाली होती. रझा अकादमीला परवानगी नव्हती मुंबईतील काही संघटना या घटनांचा निषेध करण्यासाठी तयारी करत होतं. सगळ्या संघटनांची माहिती पोलिसांना अगोदर होती. पण 11 ऑगस्टला आझाद मैदानावर ज्या रझा अकादमीने हिंसाचार केला त्या संघटनेला परवानगी नव्हती. तर मदिना तुलम नावाच्या संघटना ज्याचा अध्यक्ष हा कुर्ल्यातील एक व्यापारी आहे त्यांने म्यानमार,आसाम,ब्रम्हातील घटनेचा निषेध करण्यासाठी परवानगी मागितली होती असा गौप्यस्फोट गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केला. तसेच आझाद मैदानावर निघणार्‍या मोर्चात 1000 लोक असतील असंही सांगण्यात आलं होतं. पण यानंतर आणखी एका वेगळ्या संघटनेनं परवानगी मागितली होती. आता ह्या विविध संघटना होत्या. त्यामुळे त्या एकत्र येऊन निषेध करतील असं गृहीत धरुन मोर्चाला परवानगी देण्यात आली. तसेही शक्यतो सगळ्यांचं आंदोलनाला परवानगी दिली जाते. आणि आझाद मैदानावर नेहमी मोर्चे निघत असतात. कधी शंभरांच्या संख्येत, तर कधी हजारोंच्या संख्येनं मोर्चे निघतात. या सगळ्या मोर्चांना पोलीस पुर्ण सुरक्षा देते कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेते. पोलिसांना अतिआत्मविश्वास नडलामात्र 11 ऑगस्टच्या दिवशी निघालेला मोर्चा असं हिंसक वळण घेऊ शकेल याचा अंदाज चुकला. या मोर्चात 90 टक्के लोकंही शांततापुर्ण आंदोलन करण्यासाठी आले होते. पण यातील 10 टक्के लोकं ही ज्वलनशील पदार्थ,लोखंडी रॉड,सळई घेऊन सहभागी झाले होते. प्रत्येक वेळा पोलीस सगळ्यांचीच चौकशी करु शकत नाही. आतंकवादी जेव्हा काही क्रुरकृत करते ते सुध्दा पोलिसांना याची खबर लागू नये यांची खबरदारी घेते आणि जे व्ह्याचे नाही ते होते. हिंसाचाराच्या अगोदर पोलिसांना आणि गृहखात्याला या घटनेचं गांर्भिय होतं.पण अचानक एक जमाव हिंसक झाला आणि काही मिनिटात त्यांनी हैदोस घातला. यावेळी घटनेची पुर्वमाहिती लक्षात घेता हा वणवा वाढू नये म्हणून त्यादिवशी जमावाला आवर घालण्यात आला. कारवाई केली नाही. पण हिंसाचार झाल्यानंतर 30 मिनिटात मुंबई पोलिसांनी मुंबई पुर्वपदावर आणली. ताबडतोब राज्यात हायअलर्ट जारी करुन याचे पडसाद उमटू नये याची पुर्ण चोखबंदोबस्त ठेवला असंही पाटील म्हणाले.अंडरवर्ल्डचा हात असू शकतोया हिंसाचारात हैदोस घालणार्‍या दंगेखोरांना पोलीस अटक करत आहे. आतापर्यंत ताब्यात असलेल्या दंगेखोरांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमागे कोणाचा ब्रेन आहे याचा शोध घेतला जात आहे तसेच यांना पाठीशी घालत त्यांना सोडलं जाणार नाही. ताब्यात असलेल्या दंगेखोरांच्या कबुलीवरुन लवकरच त्यांना अटक होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या प्रकरणामागे अंडरवर्ल्डचा हात असू शकतो याची शक्यताही गृहमंत्र्यांनी नाकारली नाही.