#मोर्चा

Showing of 1093 - 1106 from 1464 results
गाडगीळ समितीच्या अहवालाविरोधात निलेश राणेंचा महामोर्चा

बातम्याOct 29, 2012

गाडगीळ समितीच्या अहवालाविरोधात निलेश राणेंचा महामोर्चा

29 ऑक्टोबरडॉ. माधव गाडगीळ समितीचा पश्चिम घाट अभ्यास अहवाल सरकारनं स्वीकारू नये, या मागणीसाठी काँग्रेस खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात महामोर्चा काढला. सुप्रीम कोर्टाने हरियाणा सरकार विरुद्ध दीपक कुमार खटल्यात निकाल देताना सर्व प्रकारच्या गौण खनिजांच्या खाणींनाही पर्यावरण दाखला आवश्यक असल्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला देण्यात आले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 31 डिसेंबरपर्यंत खाणविषयक कोणत्याही प्रकारच्या परवान्यांना स्थगिती आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातल्या जांभा दगडाच्या खाणी बंद आहेत. या सगळ्याला गाडगीळ समितीचा अहवाल कारणीभूत असल्याचा उद्याोगमंत्री नारायण राणे यांचा आरोप आहे. पण निलेश राणेंचा हा मोर्चा म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी असल्याची टीका विरोधक करत आहे.