मोर्चा

Showing of 1431 - 1444 from 1620 results
काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकू - आठवले

बातम्याMay 27, 2011

काँग्रेसला सत्तेतून बाहेर फेकू - आठवले

27 मेशिवशक्ती भीमशक्तीच्या एकत्रित आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतून सत्तेतून हद्दपार होईल असा सूर औरंगाबाद येथे झालेल्या पहिल्या संयुक्त बैठकीत सर्वच नेत्यांनी काढला. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येत असल्याने युतीचे नेते आनंदात आहेत. मात्र रामदास आठवले यांनी काही बाबतीतले वैचारिक मतभेद दूर झाल्यानंतरच निवडणुकीतील प्रत्यक्ष युतीचा निर्णय घेतला जाईल असं बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्याचबरोबर मी एकटा शिवसेना - भाजपसोबत गेलो तरी राज्याच्या राजकारणावर त्याचा फरक पडू शकतो असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील वाढती महागाई आणि माफियाराजच्या विरोधात नऊ जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर रामदास आठवले यांच्या पक्षासोबत शिवसेना- भारतीय जनता पक्ष धडक मोर्चा नेणार आहे. त्या मेळाव्याच्या तयारीसाठी औरंगाबाद येथे या तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक झाली. राज्य सरकारविरूध्द संघर्ष करण्यासाठी झालेल्या या बैठकीत शिवसेना - भाजपने रामदास आठवले यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले खरे पण आठवले यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका घेत लग्न ठरंलय पण अजून अक्षता पडायच्या बाकी आहेत असे स्पष्ट करून वैचारिक पातळीवर काही गोष्टींची तडजोडीचा प्रस्तावच शिवसेना भाजपसमोर ठेवला आहे.रामदास आठवले यांनी 1090 च्या निवडणुकीत मी एकटा काँग्रेस सोबत होतो. प्रकाश आंबडेकर, रा सु गवई, जोंगेद्र कवाडे त्यावेळी कॉग्रेससोबत नव्हते. त्यावेळी काँग्रेसने 141 जागा जिंकल्या. त्यातील 36 जागा माझ्या पक्षामुळे जिंकल्या हे शरद पवारही मान्य करतात. आता आमचा 36 चा आकडा आहे. मात्र काही बाबतीत वैचारिक मतभेद आहेत. ते आधी दूर करावे लागतील.असं रामदास आठवले यांनी सांगितले.या मेळाव्यात भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी करीत आठवले यांचा काँग्रेस राष्ट्रवादीने कसा अपमान केला हे सांगून आता या युतीला कोणीच रोखू शकणार नाही असे ठासून सांगितले. पण मेळाव्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही आठवले यांनी प्रत्यक्ष युतीचा निर्णय ऑक्टोबरनंतरच घेऊ असे सांगून पुन्हा एकदा तळ्यात मळ्यात भूमिका घेतली. गोपीनाथ मुंडे म्हणतात, ज्याना स्वत:ची बँक सांभाळता आली नाही ते तुम्हाला काय सांभाळणार अजित पवार नेहमी धमक्या देतात. मी अस करीन तसं करीन पण बँक बरखास्त केली तर काय केलं त्यांनी. मला सांगा काँग्रेस पक्षाचे 56 माजी खासदारांनी अजूनही त्यांचा बंगला सोडलेला नाही. पण त्यांना बाहेर काढल का ? पण रामदासजी तुमच्या बंगल्याचे कुलूप तोडून सामान बाहेर फेकले. ज्यांनी तुम्हाला बाहेर काढलं. त्यांना आता मुंबईच्या सत्तेबाहेर काढण्याची वेळ आली आहे. बदला म्हणून म्हणत नाही. हा सामाजिक न्याय आहे. यावर रामदास आठवले म्हणतात, जर मी शिवशक्ती भीमशक्तीत आलो तरी आंंबडेकरांचा विचार सोडणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मला राज्यसभा द्यायला तयार आहेत. कदाचित ते मंत्रीपदही देतील पण माझ्या एकट्याला ते मिळेल. मला आता कार्यकर्त्यांचा विचार करायचा आहे. या बैठकीनंतर आता पुणे नाशिक येथेही मेळावे होणार आहेत.