मोबाईल फोन

Showing of 118 - 131 from 133 results
नोकरीचं आमिष दाखवून युपीतल्या तरूणांची फसवणूक

बातम्याMay 18, 2011

नोकरीचं आमिष दाखवून युपीतल्या तरूणांची फसवणूक

18 मेसरकारी नोकरीचे आमिष दाखवून बिहार आणि उत्तरप्रदेशमधील शेकडो बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झालेले तरुण हे अत्यंत गरीब आणि बेरोजगार असून सुपरवायझर, क्लार्क, शिपाई अशा पदांसाठी त्यांचा पाटण्यामध्ये इंटरव्ह्यू घेण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडून 10 हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेण्यात आले आहे. आणि त्यांना पुण्यामध्ये हेड ऑफिस असल्याचे सांगून तिथे ट्रेनिंगसाठी जायला सांगण्यात आलं. पण हे तरुण जेव्हा पुण्याला पोहोचले तेव्हा या पत्त्यावर ऑफिसच नसल्याचं उघड झालं. आपली फसवणूक झाल्याचे लक्षाच आल्यावर या तरुणानी शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं. गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये सुमारे असे 3 ते 4 हजार तरुण बिहार आणि उत्तरप्रदेश मधून पुण्यामध्ये पोहोचले आहेत. ज्यांनी या विद्यार्थ्यांना अमिष दाखवले आणि इंटरव्ह्यू घेतले त्या दोनही तरुणांचे मोबाईल फोन आता स्वीच ऑफ झाले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading