News18 Lokmat

#मोदी शहा

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

व्हिडिओApr 12, 2019

मोदींची 'मन की बात' हिटलरची काॅपी, राज ठाकरेंचं UNCUT भाषण

12 एप्रिल : नांदेडमधल्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींच्या अनेक भाषणांचा दाखला देऊन राज ठाकरेंनी जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींनी खोटी स्वप्न दाखवल्याचा आरोप केला. रशियाच्या पद्धतीनं मोदी-शहा यांचा कारभार सुरू आहे. काही दिवसांनी फक्त आठ-दहा लोकं देश हाकणार, असं भाष्य राज ठाकरेंनी केलं. गांधी-नेहरू परिवारावर टीका हाच मोदींचा अजेंडा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात मागील 5 वर्षात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण सरकार अपयशी ठरली. विकासाऐवजी नरेंद्र मोदी फक्त गांधी आणि नेहरू परिवारावर टीका करतात. प्रधानसेवक हा शब्दही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधी वापरला होता, याची माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली.