#मेधा पाटकर

Showing of 66 - 79 from 151 results
मेधा पाटकर यांचे आरोप निराधार -अजित पवार

महाराष्ट्रMay 14, 2013

मेधा पाटकर यांचे आरोप निराधार -अजित पवार

19 एप्रिलमेधा पाटकर यांचे आरोप निराधार असून सिंचन श्वेत पत्रिकेच्या माध्यमातून यापूर्वीच सत्य लोकांसमोर आलं आहे असं प्रतिउत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय. त्यांच्याबरोबरच भाजप नेते गोपीनाथ मुंडे, सुनील देशमुख आणि वडेट्टीवार यांनीही मेधाताईंचे आरोप फेटाळून लावले आहे. गुरूवारी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी विदर्भातल्या घोडचेरी सिंचन प्रकल्पात अजित पवारांनी 27 कोटी रुपयांची लाच घेतली असा गौप्यस्फोट केला. याशिवाय भाजप नेते नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, सिंचन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते सुनील देशमुख यांनीही लाच घेतली असा आरोप मेधा पाटकर यांनी केला होता. गोसेखुर्द कालव्यातील एका भागाचं कॉन्ट्रॅक्ट महालक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनी लिमिटेडमधल्या एका संचालकाच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाच्या अधिका-यांनी धाड टाकली होती. आयकर खात्याच्या धाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी हे आरोप केले होते.