मॅच

Showing of 1210 - 1223 from 1239 results
भारताची विजयाची हॅट्रिक

बातम्याNov 20, 2008

भारताची विजयाची हॅट्रिक

20 नोव्हेंबर, कानपूरकानपूरला झालेल्या 3री वन-डेसुद्धा भारताने जिंकली आहे. अपुर्‍या प्रकाशामुळे 40 ओव्हर्सनंतर मॅच थांबवण्यात आली. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताला विजयी घोषित करण्यात आलं. 49 ओव्हर्समध्ये इंग्लंडने भारतासमोर 241 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. खराब सुरुवातीनंतर भारताने डाव सावराला. 40 ओव्हर्समध्ये भारताने 5 विकेट गमावत 198 रन्स केले होते.पहिल्यांदा बॅटिंग करताना इन फॉर्म बॅट्समन रवि बोपाराला ओपनिंगला पाठवायची इंग्लंडची चाल यशस्वी ठरली, आणि त्याने इयन बेलच्या साथीने इंग्लंडला 79 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. पण मुनाफ पटेलने बेलला आऊट केलं आणि इंग्लंडच्या इनिंगला खिंडार पाडलं. हरभजन सिंगने ओव्हरमागे दोन रन देत केविन पीटरसन, पॉल कॉलिंगवूड आणि ओवेन शहा या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्यात. तर युवराजने जम बसलेल्या बोपाराला आऊट करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. बोपाराने आऊट होण्यापूर्वी शानदार हाफ सेंच्युरी करत साठ रन्स केले. पटेलने अ‍ॅंडरसनची विकेट घेत इंग्लंडची इनिंग संपुष्टात आणली.भारतापुढे आव्हान होतं ते 49 ओव्हर्समध्ये 241 रन्सचं. सिरीजमधली सलग तिसरी मॅच जिंकण्यासाठी भारताला चांगली सुरुवात हवी होती, पण ओपनर गौतम गंभीरला फ्लिन्टॉफने आऊट केलं. सुरुवातीला अवघ्या चौत्तीस रन्समध्ये भारताच्या दोन विकेट गेल्या. सलग दोन वन डेमध्ये सेंच्युरी करणारा युवराज या मॅचमध्ये 38 रन्स करून आऊट झाला. त्यानंतर लगेचच सुरैश रैनाही एक रन काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सेहवाग आणि रोहित शर्मानं भारताचा डाव सावरला पण मग रोहित शर्माच्या पाठोपाठ सेहवागही आऊट झाला. पण शेवटी धोनीनं युसुफ पठाणबरोबर चांगली पार्टनरशीप करत डाव सावरला.

ताज्या बातम्या