Elec-widget

#मॅच

Showing of 1158 - 1171 from 1171 results
टेस्ट मॅचच्या तिकीट दराविरोधात दर्शकांची  निदर्शनं

बातम्याNov 5, 2008

टेस्ट मॅचच्या तिकीट दराविरोधात दर्शकांची निदर्शनं

5 नोव्हेंबर नागपूर,भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानची चौथी आणि शेवटची टेस्ट बुधवारपासून नागपूरात सुरू होतेय. या टेस्ट मॅचच्या तिकीट दराविरोधात संतप्त क्रिकेट फॅन्सनी व्हीसीएच्या नव्या स्टेडियमसमोर जोरदार निदर्शनं केली. टेवेण्टी 20च्या जमान्यात टेस्ट मॅचला गर्दी कमी होतेय. त्यातच हे नवीन स्टेडियम शहरापासून खूपच लांब असून यंदा तिकीटांचे दरही मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. प्रेक्षकांना यापूर्वी कोणत्याही दिवसाचं तिकीट मिळायचं. आता मात्र त्यांना पाचही दिवसाचं तिकीट खरेदी करावं लागणार आहे. नागपूर टेस्ट ही सौरव गांगुलीची शेवटीची टेस्ट मॅच आहे. त्यामुळे त्याचे फॅन्स या मॅचला गर्दी करण्याची शक्यता आहे. पण वाढवलेले तिकीट दर त्यांना परवडणारे नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. म्हणून वाढलेल्या तिकीट दराविरोधात व्हिसीएच्या कार्यालयासमोर दर्शकांनी निदर्शनं केली.