मॅच

Showing of 1119 - 1132 from 1245 results
मुंबई इंडियन्सची आमने सामने डेक्कन चार्जर्सशी चेन्नई सुपरकिंग्जची तर कोलकाता नाईट रायडर्सशी

बातम्याApr 25, 2009

मुंबई इंडियन्सची आमने सामने डेक्कन चार्जर्सशी चेन्नई सुपरकिंग्जची तर कोलकाता नाईट रायडर्सशी

25 एप्रिलआयपीएलमध्ये आज सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सची आमने सामने ऍडम गिलख्रिस्टच्या डेक्कन चार्जर्सशी आहे. तर महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा मुकाबला ब्रँडम मॅक्यूलमच्या कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. पहिली मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजता डरबनमध्ये होणार आहे. तर दुसरी मॅच रात्री 8 वाजता केपटाऊनमध्ये खेळण्यात येणार आहे. पहिल्या आयपीएलमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या डेक्कन चार्जर्सची कामगिरी या हंगामात मात्र तुफान होतेय. सलग दोन मॅच जिंकत डेक्कननं पॉईंट टेबलमध्ये अव्वल क्रमांक पटकावलाय. वीरेंद्र सेहवागच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सनंही दोन मॅच जिंकत 4 पॉईंटची कमाई केलीय. दिल्लीची टीम दुसर्‍या क्रमांकावर आहे. दोन मॅचमध्ये 3 पॉईंट कमावणारी मुंबई इंडियन्स पॉईंट टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सवर थरारक विजय मिळवणारी राजस्थान रॉयलची टीम 3 पॉईंटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading