शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातील वाघाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज (शनिवार) सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात आग पसरली आहे.