मुलगी

Showing of 2627 - 2640 from 2778 results
सावित्रीचा वसा चालवणार्‍या शिक्षिका स्वाती वानखेडे !

बातम्याSep 5, 2011

सावित्रीचा वसा चालवणार्‍या शिक्षिका स्वाती वानखेडे !

दीप्ती राऊत, नाशिक05 सप्टेंबरशिकवणं म्हणजे वसा आणि शिक्षक म्हणजे गुरू हे गणित बदलत्या काळात मागे पडतंय. त्यातही सरकारी शिक्षक म्हणजे विशिष्ट लाभांसाठी सोयीसाठीची नोकरी म्हणून पाहाण्याचं वातावरण रुजलंय. अशावेळी नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका स्वाती वानखेडे वेगळं उदाहरण ठरताहेत.शाळेआधी त्यांच्या कामाची सुरुवात होते ती गावातल्या फेरीनं. घराघरात जावून पालकांना भेटणं आणि मुलांना घेवूनच शाळेत येणं. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षिका स्वाती वानखेडे गेल्या 30 वर्षांपासून हे न चुकता करत आहेत. जिथे रस्ताही नव्हता अशी शेरपाड्याची शाळा त्यांनी खास मागून घेतली होती.शिक्षिका स्वाती वानखेडे म्हणतात, तिथे रस्ता नव्हता, डांबराचा सोडा, पायवाटही नव्हती. पाण्यातून जाताना मजा यायची. चांगली शाळा मिळाली पाहिजे किंवा रस्त्यावरची शाळा मिळाली पाहिजे मग मी नोकरी करेन हे खोटं आहे. कारण कुठलीही शाळा मिळो मी ती घडवेन ही हिंमत पाहिजे.याच हिमतीवर त्यांनी शेरपाड्याच्या शाळेचा कायापालट केला आणि आता तिरडशेडच्या शाळेत पुन्हा हा सावित्रीचा वसा सुरू केला. ग्रामशिक्षण समितीच्या सदस्या पद्मा वाघ म्हणतात, मुलांना संस्कार मिळाले. शाळेत न जाणार्‍यांना त्यांनी शाळेत आणलं. रात्रीचे वर्ग सुरू केले. महिलांना स्वावलंबी केलं. त्यांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांच्या शिकवण्याने पालकांना खूपच दिलासा मिळाला. आणि प्रेरणाही.पालक संगीता आचारी म्हणतात, मला एकच मुलगी आहेत. सगळे म्हणायचे बाहेरच्या शाळेत टाका. पण इथंच खूप सुधारणा झाली. वाटतंय माझी मुलगी आजच शिक्षिका बनली आहे.वानखेडे मॅडमच्या या वेगळेपणाची दखल थेट कॉमनवेल्थनी घेतली. कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग अर्थात कोल अवॉर्ड मिळवणार्‍या त्या पहिल्या आणि एकमेव भारतीय आहेत. या कामामागचा त्यांचा विचार हीच त्यांची ताकद आहे.याबद्दल वानखेडे मॅडम म्हणतात, जिथे फाटकं आहे तिथे शिवायला खूप आवडतं. जिथे ऑलरेडी तयार आहे तिथे काम करायला काही वाटत नाही. जिथे कोणी शिक्षक जायला तयार नाही तिथे त्यांच्यातली सावित्री त्यांना स्वस्थ बसू देत नाही. यावर वानखेडे मॅडम सांगता, कारण विनावेतन, विनामानधन काम करणार्‍या सावित्रीचा वसा मला मिळाला आहे. अशा या सावित्रीच्या लेकीला आयबीएन लोकमत परिवाराच्यावतीने शिक्षक दिनाच्या लाखलाख शुभेच्छा.

ताज्या बातम्या