#मुलं

Showing of 1418 - 1431 from 1467 results
आपत्ती व्यवस्थापन (भाग - 1)

बातम्याDec 6, 2008

आपत्ती व्यवस्थापन (भाग - 1)

मुंबई नुकतीच एका दहशतवादी हल्ल्यातून सावरत आहे. जगभरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही आपत्तींचं प्रमाण वाढवत आहे. त्यात जगावर वारंवार येणारी संकटं पाहता ' टेक ऑफ 'मध्ये चर्चा झाली ती आपत्ती व्यवस्थापनावर म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेण्ट या विषयावर.आपत्तींपासून आपलं आणि इतरांचं संरक्षणासाठी गरज असते हुशार आणि प्रशिक्षित (ट्रेण्ड) मनुष्यबळाची. हे मनुष्यबळ तयार होतं ते वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून. TISS म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे वेगवेगळे ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम आहेत, ज्यातून आपत्तींचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित माणसं घडवली जातात. आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी ' टेक ऑफ ' जमशेदजी टाटा फॉर डिझास्टर मॅनेजमेंटचे प्रा. महेश कांबळे आणि नाशिकच्या रेड आर (रजिस्टर इंजिनिअर्स इन डिझास्टर रिलिफ) या संस्थेत लर्निंग अ‍ॅण्ड डेव्हलपिंग प्रोगॅम मॅनेजर म्हणून काम करणारे मंदार वैद्य आले होते.आपत्ती व्यवस्थापन हा विषय अतिशय गंभीर असला तरी त्याविषयातून काम करणा-याला निश्चितच आनंद मिळतो.TISS मध्ये आपत्ती व्यवस्थापनचे अभ्यासक्रम ( कोर्सेस ) कोणाकोणाला करता येतात ? काय धून मुलं या संस्थेत येतात ?प्रा. महेश कांबळे : सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट सेंटरची स्वत:ची प्रवेश परीक्षा असते. या प्रवेश परीक्षेनंतर प्रत्येक विद्यार्थ्याची मुलाखत घेतली जाते. विद्यार्थ्याचे ग्रॅज्युएशनचे गुण, प्रवेश परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण यांची गोळाबेरीज करून, निरनिराळ्या चाचणी परीक्षांमधून आम्ही विद्यार्थ्यांची निवड करतो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना एम.ए इन डिझॅस्टर मॅनेजमेंटआणि एम.एस.सी इन डिझॅस्टर मॅनेजमेंट अशी दुहेरी डिग्री मिळते. कारण या डिझॅस्टर मॅनेजमेण्टच्या अभ्यासक्रमासाठी इंजिनिअरिंग, सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांतून ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली मुलं येतात त्यांना एमएससी इन डिझॅस्टर मॅनेजमेंट ही डिग्री मिळते. जे विद्यार्थी आर्टस्‌च्या बॅगराऊण्डमधून म्हणजे एम.ए इन सोशल वर्क, एम.ए. इन सोशल सायन्स करून मग आमच्याकडे डिझॅस्टर मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना एम.ए. इन डिझॅस्टर मॅनेजमेंट ही डिग्री मिळते. विद्यार्थ्यांना अशी दुहेरी डिग्री मिळण्याचं कारण म्हणजे ज्याप्रकारे TISSने हा कोर्स डिझाईन केला आहे त्यात जिओ इन्फॉरमेटिक्स, रिमोट सेन्सिंग, जीआयएसचा मोठा भाग आहे. म्हणजे हा मल्टी डिसिप्लीनरी अभ्यासक्रम आहे.डिझॅस्टर मॅनेजमेंटमध्ये नक्की असतं तरी काय ?मंदार वैद्य : ज्या ठिकाणी मोठी आपत्ती होते तिकडची परिस्थिती अत्यंत बिकट असते. सगळ्या सिस्टीम्स् असतात त्या कोलॅप्स झालेल्या असतात. मोठ्याप्रमाणात केऑस निर्माण झालेली असते. अशा ठिकाणी जाऊन सगळ्या सिस्टीम्स रिअरेंज करणं, आपत्तीग्रस्त भागातल्या लोकांचं जीवन मूळपदावर आणण्यास मदत करणं हा डिझॅस्टर मॅनेजमेंटसाठी काम करणा-या लोकांचा मुख्य हेतू असतो. डिझॅस्टर मॅनेजमेंटमध्ये काम करताना आम्ही दहा सेक्टर्सबरोबर काम करत असतो. आपत्तीमुळं लोकांचं विस्थापन होतं. अशावेळी सर्वात आधी या विस्थापित लोकांच्या निवा-याची व्यवस्था करावी लागते. ज्याला आम्ही शेल्टर मॅनेजमेंट म्हणतो. या शेल्टर मॅनेजमेंटमध्ये विस्थापितांना थंडी, वारा, ऊन आणि पावसापासून संरक्षण होईल, अशा घरांची चांगल्या घरांची व्यवस्था करावी लागते. त्यानंतर या लोकांची पाण्याची आणि स्वच्छतेची सोय करावी लागते. या दुस-या गरजेला वॉटर अ‍ॅण्ड सॅनिटेशन म्हटलं जातं. डिझॅस्टर मॅनेजरची तिसरी जबाबदारी असते ती फुड आणि न्युट्रीशनची. विस्थापित झालेल्या लोकांना चांगल्या दर्जाचं अन्न मिळवून द्यावं लागतं. त्यानंतर इतर निरनिराळ्या कार्यक्रमांना सुरुवात होते. त्यात लाईव्हली रेस्क्यू सारखा कार्यक्रम असतो. यासाठी आम्हाला लॉजिस्टीशियन लागतात, इंजिनिअर्स लागतात, आयटी एक्सपर्ट लागतात. जिथे वॉर झोन असतो, तिथे सिक्युरिटी मॅनेजमेण्ट करणारी माणसं लागतात.कोणतीही आपत्ती आली की ती ज्याच्यावर येते त्याला प्रचंड मानसिक धक्का बसतो. अशावेळी लोकांना त्यातून कसं सावरायचं याचं प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनामध्ये दिलं जातं का ?प्रा. महेश कांबळे : जमशेदजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट सेंटरमध्ये आम्ही डिप्लोमा इन सायको सोशल केअर इन डिझॅस्टर सिच्युएशन हा विशेष ट्रॉमा सिच्युएशन हाताळण्यासाठी आम्ही फोकस्ड कोर्स शिकवतो. आपत्ती येते तेव्हा त्या आपत्तीचा सामना अबालवृद्धांना करावा लागतो. हा सामना करताना त्यांना जबदस्त असा मानसिक आघात होतो. तर या मानसिक आघातातून आपद्ग्रस्तांना कसं बाहेर काढावं याचं प्रशिक्षण यात दिलं जातं.मुंबईने जो काही नुकताच जबरदस्त दहशतवादाचा सामना केला आहे. त्यावेळी या आपत्तींचा सामना करण्यासाठी आपणही काहीतरी शिकावं असं लोकांना वाटायला लागलं आहे. तर अशा लोकांसाठी जमशेदजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट सेंटरमध्ये काही शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत का ?प्रा. महेश कांबळे : सामान्य लोकांसाठी आमच्या केंद्रानं अजूनपर्यंत तरी असा वेगळा कोर्स सुरू केला नाहीये. पण आजपासून हॉटेल ताजच्या कम्चा-यांना आम्ही कोणतीही आपत्ती आली तरी काय करायला पाहिजे याचं प्रशिक्षण देणार आहोत. हे चार दिवसांचं वर्कशॉप असणार आहे.नीडबेस ट्रेनिंगसाठी आणि आपत्ती व्यवस्थापन करताना स्वयंसेवक घडवण्यासाठी रेड आर ही संस्था कसं काम करते ?मंदार वैद्य : आमची रेड आर ही संस्था आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक घडवण्याचं काम मोठ्याप्रमाणावर करत आहे. आम्ही यात स्वयंसेवकांना 13 शेल्टर मॅनेजमेंट, फुड सिक्युरिटी, फर्स्ट एड, रेस्क्यू मॅनेजमेंटसारखं 13 प्रकारचं प्रशिक्षण देतो. रेड आरचं वैशिष्ट्य म्हणजे भारतात कुठेही कोणाला आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण द्यायचं असेल तर रेड आर ही संस्था बोलावणं आल्यावर लगेच जाते.आपत्ती आली की डॉक्टर्सनाही त्या ठिकाणी लोकांच्या औषधोपचारासाठी जावं लागतं. तर डॉक्टरांसाठी काही विशेष अभ्यासक्रम जमशेदजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट सेंटरमने तयार केला आहे का?प्रा. महेश कांबळे : एम. एस. सी इन डिझॅस्टर मॅनेजमेंट हा कोर्स आम्ही मिड करिअरवाल्यांसाठीच बनवलेला आहे. हा कोर्स आमच्याकडे डॉक्टर्सही शिकत आहेत. आताआम्ही पब्लिक हेल्थसाठी कॉन्सन्ट्रेशन कोर्सही सुरू केला आहे. डिझॅस्टर मॅनेजमेंटचा बेसिक कोर्स केल्यानंतर पब्लिक हेल्थचा कोर्स करता येतो. ज्याने डिझॅस्टर मॅनेजमेंट अधिक प्रभावीपणे करता येतं.आपत्ती व्यवस्थापनाबाबत लोकांमध्ये जागृती व्हावी जमशेदजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट सेंटर काही करू शकणारेय का ? सरकार काही याबाबतीत मदत करू शकणारेय का ?प्रा. महेश कांबळे : हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकार याबाबतीत काही करत नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. गेल्या 3 वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये युएनडीपीच्या डिझॅस्टर मॅनेजमेंट रिस्क प्रोग्रॅमची अंमलबजावणी होत आहे. त्यात महाराष्ट्रातले जे नैसर्गिक आपत्तींसाठीचे क्रिटीकल जिल्हे आहेत अशा जिल्ह्यांतल्या गावात शाळांना बरोबर घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण मायक्रो लेव्हलला जाऊन दिलं जात आहे. या प्रोग्रॅमध्ये गावातल्या लोकांना प्रशिक्षण दिलं गेलंय, शाळेतल्या मुलांना प्रशिक्षण दिलं गेलंय. वस्तीपातळीवरही आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं याचं म्हणजे कम्युनिटी बेस डिझॅस्टर मॅनेजमेंटचा प्लॅन आखण्यात आला आहे. आमचे सगळे विद्यार्थी हा कोर्स आवडीने करत आहेत.महाराष्ट्रात कुठे कुठे डिझॅस्टर मॅनेजमेंटचे कोर्से होतात ?प्रा. महेश कांबळे : सोशल वर्कचा जो अभ्सासक्रम आहे, त्यात डिझॅस्टर मॅनेजमेंट हा विषय असतो. त्यामुळे ज्याज्या कॉलेजेसमधून सोशलवर्क हा विषय शिकवला जातो, तिथे तिथे डिझॅस्टर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम शिकवला जातो. फक्त टाटा इन्स्टिट्यूटमध्ये डिझॅस्टर मॅनेजमेंटचा स्पेशलाईज्ड कोर्स आहे. कम्युनिटी बेस डिझॅस्टर मॅनेजमेंटचेही कोर्सेस शिकवले जात आहेत. सिव्हिल डिफेन्स या संस्थेमधूनही डिझॅस्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण दिलं जात आहे.डिझॅस्टर मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या आपत्तींना तोंड देण्यासाठी कुठल्याप्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?मंदार वैद्य : त्सुनामी, सायक्लोन, भूकंप, आग लागणं, इमारत पडणं यांसाख्या नैसर्गिक आपत्तींना डोळ्यांसमोर ठेवून डिझास्टर मॅनेजमेण्टच्या अभ्यासक्रमाची रुपरेखा आखली जाते.डिझॅस्टर मॅनेजमेंट शिकणा-यांना काय पद्धतीच्या जोखमी घ्याव्या लागतात ? ते कामं कसं असतं ?मंदार वैद्य : रेड आर ही अशी संस्था आहे की जी आपत्तींमध्ये जाऊन उत्तम काम करणा-यांचा, लोकांना जाऊन मदत करणा-यांचा सतत शोध घेत असते. अशा स्वयंसेवकांची आमच्याकडे यादी आहे. रेड आरचा म्हणजे रजिस्टर इंजिनिअर्स इन डिझॅस्टर रिलिफ . आम्हीआमच्या नावाला साजेसं काम आपत्ती व्यवस्थापनात करत असतो. संस्थेची सुरुवातच इंजिनिअर्सने केली होती. पण आता लॉजिस्टीशियन्सपासून सोशोलॉजिस्टपर्यंत सगळेच या संस्थेसाठी काम करत आहेत. वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये काम करणा-यांचं रजिस्टर आम्ही बनवत आहोत. या लोकांचा पद्धतशीरपण इंटरव्ह्यू घेतला जातो. नंतर त्यांना थोडं ट्रेनिंग देऊन त्यांची परीक्षा घेतली जाते. त्यात उत्तीर्ण झाली माणसं ही नंतर रेड आरचे सभासद होतात. नंतर भारतात जिथे जिथे म्हणून आपत्ती येते त्यात्या ठिकाणी आम्ही रेडआरच्या मेम्बर्सना पाठवतो.मुलींसाठी डिझॅस्टर मॅनेजमेंट हे क्षेत्र करिअर म्हणून कसं आहे ?मंदार वैद्य : आमच्याकडे डिझॅस्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेण्यासाठी येणा-यांना प्रत्येक प्रकारच्या रिस्कची जाणीव करून देतो. त्याप्रमाणे त्यांचं प्रशिक्षण देतो. जिथे रिस्क आहे, तिथे ती मॅनेज करता येते. ती मॅनेज करता आली की झालं. आम्हाला आजपर्यंत फारच थोड्या महिला कार्यकर्त्या म्हणून लाभल्या आहेत. स्त्री - पुरुषांसाठी डिझॅस्टर मॅनेजमेंटमध्ये समान संधी असल्यामुळे मुलींना हे क्षेत्र करिअर म्हणून उत्तम आहे.डिझॅस्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण देणा-या संस्थांची नावं :जमशेटजी टाटा सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटटाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसलाला जमनादास गुप्ता मार्गपो. बॉ. 8313, देवनारमुंबईफोन-022-25563289www.tiss.eduसेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटयशवंतराव चव्हाण अ‍ॅकडेमी ऑफडेव्हलपमेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेशनराजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोडपुणेफोन 020-25608000www.yashada.orgरजिस्टर्ड इंजिनिअर्स फॉर डिझॅस्टर रिलिफनिवेदिता अपार्ट, रामबाग कॉलनीपौड रौड, कोथरूडपुणेफोन-020-25446659www.redrindia.orgटाइम्स सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटमुंबई विद्यापीठ, मानसशास्त्र विभागकलिना, सांताक्रुझमुंबईफोन-022-26526091 extn-441www.mu.tcdm.inडिझॅस्टर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्युटमित्तल कोर्ट, नरिमन पॉइंटमुंबईफोन-022-56257576gcpd@vsnl.netअनिरूद्ध अ‍ॅकॅडेमी ऑफ डिझॅस्टर मॅनेजमेंटमंदिर रोड , अशोकनगरघोर्टन पाडा, दहिसर (पू)मुंबईमोबा.- संध्या पवार : 9819729641नॅशनल सिव्हिल डिफेन्स कॉलेजसिव्हिल लाईन, नागपूरफोन-0712-2565614www.ncdenagpur.nic.inनॅशनल सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंटआयआयपीए, इंद्रप्रस्थ इस्टेट, रिंग रोडनवी दिल्लीफोन-011-33199541www.ncdm.india.orgडिझॅस्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्युटकचनार, पर्यावरण परिसरअरेरा कॉलनीभोपाळwww.dmibpl@bomb.vsnl.net.inनॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर फॉर अर्थक्वेक इंजिनिअरिंगआयआयटी, कानपूरफोन-0512-2597866www.nicee.orgपीआरटील इन्स्टिट्युट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट एन्व्हान्मेंटल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चपर्यावरण कॉम्प्लेक्स, साऊथ ऑफ साकेतमैदान गढी मार्गनवी दिल्लीwww.technologyindia.eduइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठनवी दिल्लीwww.ignou.orgऑल इंडिया डिझॅस्टर मेटिगेशन इन्स्टिट्युटगुजरातwww.aidmi.orgमहेश कांबळे 9821911081 (टाटा इन्स्टि.)