मुख्यमंत्री

Showing of 11064 - 11077 from 12077 results
मुंबईतील प्रार्थनास्थळ हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

बातम्याMar 21, 2011

मुंबईतील प्रार्थनास्थळ हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती

21 मार्चमुंबईत रस्त्यांवरच्या प्रार्थनास्थळांवर सुरू असलेल्या कारवाईला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नवीन धोरण तयार करण्यात येईल असं ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशी बांधकामं यापुढे होणार नाहीत, शिवाय सार्वजनिक ठिकाणांवर ती अडथळे होणार नाहीत अशी काळजी घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार 4 ऑक्टोबर 2010 ला सध्या अस्तित्वात असलेल्या धार्मिक स्थळांना बाजुला हटवण्यासंदर्भात एक निर्णय घेतला गेला होता. पण आता त्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विधानसभेत जाहीर केलं. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सुसंगत धोरण ठरवण्याचे निर्देश दिले होते. अशाप्रकारचं धोरण जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठलीही धार्मिक स्थळं आहेत त्या जागांवरुन हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती राहील असंही त्यांनी स्पष्ट केले.