मुकेश अंबानी

Showing of 170 - 183 from 185 results
आलिशान घरावरुन टाटांची मुकेश अंबानींवर टीका

बातम्याMay 22, 2011

आलिशान घरावरुन टाटांची मुकेश अंबानींवर टीका

22 मे,टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यावर टीका केली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीबाबत त्यांनी लंडनच्या टाईम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केलंय. भारतात आपल्याभोवती काय चाललंय आणि आपण त्यात काय बदल करु शकतो याचा प्रत्येकानं विचार करायला हवा असं त्यांनी म्हटलंय. मुकेशअंबानी यांच्या दक्षिण मुंबईतल्या अल्टामाऊंट रोड इथल्या 27 मजली घराबद्दल टाटा यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुकेश अंबानी यांना फोर्ब्सच्या अब्जावधींच्या यादीत 9 वं स्थान मिळालंय, तर टाटा मात्र या यादीत स्थान मिळवू शकलेले नाहीत.रतन टाटा नेमकं काय बोलले ते पाहूया - ''असा विचार कोणी कसं करू शकतं याचं आश्चर्य वाटतं. तिथं राहणा•यानं आपल्याभोवती काय चाललंय आणि आपण त्या परिस्थितीत काय बदल करु शकतो याचा विचार करायला हवा..जर तसा विचार कोणी करत नसेल, तर ते खूप वाईट आहे...कारण आपल्याकडे प्रचंड संपत्ती आहे तर ती लोकांची दु:खं कमी करण्यासाठी देण्याची सध्या भारताला खरी गरज आहे..''