#मुंब्रा

Showing of 157 - 166 from 166 results
राज्यात टोल विरोधी आंदोलन

बातम्याSep 19, 2010

राज्यात टोल विरोधी आंदोलन

19 सप्टेंबरराज्यात सध्या टोलवसुली विरोधात वातावरण तापले आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली असताना सर्रासपण टोलवसुली सुरू आहे. रस्ते खराब असतील तर टोलवसुली करता येणार नाही. असा निर्णय सरकारने घेतलाय पण तरीही अनेक ठिकाणी रस्ते खराब असताना टोल घेतला जातो. पण आता या अवैध टोलवसुलीला आळा बसला आहे. मुंब्रा हायवेवर रस्त्यांवर खड्‌ड्यांचं साम्राज्या पसरले आहे. तरीही इथे मोठ्याप्रमाणात टोलवसुली सुरू होती. पण आयबीएन लोकमतने ही बाब काल निदर्शनास आणल्यानंतर आता हे रस्ते दुरूस्त होईपर्यंत टोलवसुली थांबवण्यात आली आहे. शिवसेनेकडुन भिवंडीतील टोलनाका बंद सर्वाधिक टोलनाके असलेल्या ठाणे जिल्ह्यातील टोल ठेकेदारांनी पहिले रस्ते चांगले करा आणि मगच टोलवसूली करा यासाठी आज शिवसेनेने आंदोलन केले. मुंब्रा बायपास आणि भिवंडी बायपास मार्गावरील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतांनाही टोलवसूली सुरू होती म्हणून रवीवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भिवंडी बायपास टोलनाक्यावर धरणे आंदोलन करून ही टोलवसूली बंद केली. हा रस्ता पूर्ववत होईपर्यंत टोलवसूली केली जाणार नसल्याचं आयआरबी कंपनीकडूनही सांगण्यात आले आहे.नाशिकमध्ये वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष नाशिक जिल्ह्यातल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असतानाही आठ ठिकाणी टोलवसुली सुरूच असल्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष आहे. नाशिक जिल्ह्यात जोपर्यंत रस्ते चांगले होत नाहीत तोपर्यंत टोल घेण्यात येऊ नये अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. मालेगाव- मनमाड- कोपरगाव या रस्त्यांबरोबरच चांदवड- मनमाड- नांदगाव, नाशिक- वैजापुर-औरंगाबाद, नाशिक - कळवण, मालेगाव - चाळीसगाव या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तरीही या ठिकाणी टोलवसुली सुरू आहे. बारामती शहरात दुहेरी टोलबारामती शहरात दुहेरी टोल आकारला जात असल्यानं वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बारामती इथे रस्ते विकास मंडळाने 13 जून 2006 पासून टोल आकारणीला सुरूवात केली. ती आजही सुरूच आहे. यामध्ये आतापर्यंत टोलच्या रकमेत 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही सोयी सुविधा नसतांना आमच्यावर एक प्रकारे जिझिया कर लादला जात असल्याची भावना वाहनचालक व्यक्त करतात. अनेकवेळा आंदोलने होऊनदेखील टोल आकारणी सुरूच आहे. कृषीमंत्री शरद पवार यांनी उद्घाटन प्रसंगी एकेरी टोल आकारला जाईल अशी घोषणा केलेली असतांनाच शहरातील बारामती-नीरा, बारामती-इंदापूर, बारामती-पाटस बारामती-भिणगाव अशा 5 ठिकाणी टोल नाके आहेत. बारमती येथील पाचही टोलचं कंत्राट एस. एस. इंटरप्रायझेस यांच्याकडे आहे. धुळ्यात अपुरी सुविधाधुळ्याहून मुंबईला जायचं असेल तर तब्बल 400 रुपयांचा टोल चारचाकी गाड्यांना भरावा लागतो. त्याच्या बदल्यात मिळतात ते रस्त्यातले खड्डे. या मार्गावर सहा टोलनाके प्रवाशांना ओलांडावे लागतात. सुविधा मात्र काहीच नाहीत.