#मुंब्रा

Showing of 131 - 144 from 161 results
अनधिकृत बांधकामांविरोधात मुंब्य्रात कडकडीत बंद

बातम्याApr 12, 2013

अनधिकृत बांधकामांविरोधात मुंब्य्रात कडकडीत बंद

12 एप्रिलशिळफ ाट्यातल्या इमारत दुर्घटनेच्या निषेधार्थ आज मुंब्रा बंद पुकरण्यात आलाय. इथल्या सामाजिक संघटनांनी आज मुंब्रा बंदचं आवाहन केलंय. इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी आरोपींना कठोर शासन व्हावं अशी या सामाजिक संघटनांची आणि इथल्या नागरिकांचीही मागणी आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा मुंब्रा बंदला पाठिंबा मिळालाय. शिळफाट्याची इमारत कोसळून त्यामध्ये 74 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर एकूण 15 जणांना अटक करण्यात आलीये. या घटनेनंतर मुंब्रा परिसरताल्या अनधिकृत इमारतींवर धडक कारवाईदेखील ठाणे महापालिकेनं सुरू केली आहे. मात्र या कारवाईमध्ये घर गमावलेल्यांपुढे आता कुठं जायचं असा प्रश्न उभा राहिलाय. इमारती अनधिकृत असतील तर त्यांना वीज आणि पाण्याचं कनेक्शन का देता, असा सवाल आता हे नागरिक विचारत आहेत. त्यामुळेच ही कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांच्या विरोधातही आजचा हा बंद पुृकारण्यात आला.