News18 Lokmat

#मुंब्रा

Showing of 118 - 131 from 153 results
अभद्र युतीचा उद्या 'ठाणे बंद'

बातम्याApr 17, 2013

अभद्र युतीचा उद्या 'ठाणे बंद'

17 एप्रिलठाणे : मुंब्रा इथली सात मजली इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली आणि त्यानंतर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मुंब्रा इथल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु झाल्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अडचणीत आल्याने शिवसेनेच्या नेत्यांना आनंद झाला खरा पण तो थोड्या काळच टिकला. ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींना नोटीसा जाउ लागल्या. आणि त्यात शिवसेनेच्या नेत्यांच्या भागातील इमारतींना नोटिसा बजावल्या मिळाल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले. आणि त्यातूनच निर्माण झाली विविध पक्षांची अभद्र युती. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आपल्या अंगाशी येणार असल्याचं लक्षात येताच ठाण्यातल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ठाण्यात अनधिकृत बांधकामाविरोधात होणार्‍या कारवाईविरोधात ठाणे बंद पुकारला आहे. मात्र अनधिकृत बांधकामाविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारल्यामुळे शिवसेना-भाजप महायुतीत तेढ निर्माण झालीये. ठाण्यातल्या सर्वपक्षीय बंदला भारतीय जनता पार्टीनं विरोध केला आहे. तर बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्पष्ट केलंय. ठाण्यात 1094 इमारती धोकादायक -मुख्यमंत्रीदरम्यान, ठाण्यातल्या अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उत्तर दिलंय. ठाण्यात 57 इमारती अतिधोकादायक तर 1 हजार 94 इमारती धोकादायक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अतिधोकादायक इमारतींमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. एमएमआरडीएच्या भाडेतत्वावरच्या सदनिकांमध्ये या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.