मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंब्रा बायपास म्हटलं की वाहतूक कोंडी...नेहमी अवजड वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे, खड्ड्यांमुळे तर कधी अपघातांमुळे मुंब्रा बायपास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूकी कोंडी होते. पण काल रात्री मुंब्रा बायपासवर झालेली मोठी वाहतूक कोंडीचे कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल.. एका अजगरामुळे काल रात्री मुंब्रा बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती.