#मुंबई

Showing of 40 - 53 from 2279 results
VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका

बातम्याAug 1, 2018

VIDEO : मुंबई लोकलच्या या 4 स्टंटबाजांमुळे कोट्यवधी लोकांच्या जीवाला आहे धोका

मुंबई, 01 ऑगस्ट : हुल्लडबाजी करत धावत्या लोकलमध्ये स्टंट करणारे तरुण आणि त्याचा लोकलमधील इतर प्रवाशांना होणारा त्रास हा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. असाच हुल्लडबाजांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रविवारी दुपारी चार स्टंटबाजांनी जीटीबी ते सीएसएमटी प्रवासादरम्यान जीवघेणी स्टंटबाजी केली. एवढचं नाही तर एका तरुणाने तर रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा मोबाईल देखील हिसकावण्याचा प्रयत्न केलाय. धावत्या लोकलमधून बाहेर लटकत, कधी लोकलच्या वर चढून हे तरुण स्टंट करत आहेत असं या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. कधी तर थेट धावत्या लोकलमधून प्लॅटफार्मवर उतरून लोकल सोबत धावण्याचा स्टंट हे तरुण करत करतात. जिवाची कोणतीही पर्वा न करता या 4 तरुणांनी जे स्टंट केले ते खरंच त्या तरुणांच्या आणि इतर प्रवाशांच्या जिवावर बेतणारे असते. हे चार हुल्लडबाज कोण होते, हे अद्याप समोर आलेलं नाही. अशा स्टंटबाजांना शिक्षा व्हायला हवी. त्यामुळे या व्हिडीओत दिसणारे हुल्लडबाज कुठे दिसतील, तर पोलिसांना नक्की कळवा.

Live TV

News18 Lokmat
close