#मुंबई

Showing of 92 - 105 from 15455 results
VIDEO : मुक्या जिवांचा रेल्वेतून जीवघेणा प्रवास, शंभर दगावले

महाराष्ट्रApr 23, 2019

VIDEO : मुक्या जिवांचा रेल्वेतून जीवघेणा प्रवास, शंभर दगावले

हर्ष महाजन, नागपूर, 23 एप्रिल : नागपूर शहरातील पशुप्रेमींच्या सतर्कतेमुळे कोलकोता-मुंबई जनेश्वरी एक्स्प्रेसमधून अतिशय क्रूरपणे होत असलेली जवळपास हजार पशु-पक्ष्यांची वाहतूक थांबवण्यात यश आलं. हे पशु-पक्षी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यात ससे, पांढरे उंदीर, कबुतर, लव्ह बर्ड्स आणि अन्य पक्षांचा समावेश आहे. विशेष म्हणजे अशी वाहतूक होत असल्याची सूचना नागपूरच्या पशुप्रेमींना केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या कार्यालयाकडून मिळाली होती. दरम्यान, ऊन आणि गुदमरल्यामुळे जवळपास शंभर पशु-पक्ष्यांचा मृत्यू झाला. 12102 कोलकोता-मुंबई जनेश्वरी एक्स्प्रेस कोलकोत्यावरून निघाली तेव्हा याच गाडीने प्रवास करणाऱ्या सुब्रतो दास नावाच्या प्रवाशाला पार्सल व्हॅनमध्ये पशु-पक्षी असलेले पिंजरे ठेवताना काहीजण दिसले. रेल्वेनं जिवंत प्राण्यांची वाहतूक करण्यास बंदी नाही. मात्र, त्यासाठी काही नियम आहेत. मात्र, या छोट्या-छोट्या हजारो पशु-पक्ष्यांना नऊ पिंजऱ्यांमध्ये अक्षरश: कोंबलं होते.

Live TV

News18 Lokmat
close