मुंबई, 19 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकविरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन मनसेनं केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोअर परळमधील 'फिनिक्स' मॉल, कुर्ल्याच्या 'डॉयर' गारमेंट शॉप जाऊन पाकमधून आलेले कपडे न विकण्याची आवाहन केलं. यानंतर पाकमधून आलेल्या जीन्स जमिनीवर फेकून देण्यात आल्या.