मुंबई

Showing of 32059 - 32072 from 38387 results
पालिकेला दणका, संपकरी कर्मचार्‍यांना बोनस मिळणार

बातम्याAug 8, 2012

पालिकेला दणका, संपकरी कर्मचार्‍यांना बोनस मिळणार

08 ऑगस्टमुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिका प्रशासनाला दणका दिला आहे. कामगार नेते शरद राव यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या 40 हजार कर्मचार्‍यांना इतर कर्मचार्‍यांप्रमाणे बोनस देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला महापालिकेनं कोर्टात आव्हान दिलं होतं. पण महापालिकेची याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. तसेच या रकमेवर 12 टक्के व्याजही देण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. शरद राव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील 40 हजार कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागणीसाठी संप पुकारला होता. यामध्ये साफसफाई कर्मचारी,हॉस्पिटलमधील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल झाले होते. कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांना पगार दिला जाणार नाही असा पवित्रा पालिकेनं घेतला होता. या विरोधात शरद राव यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टांनी आपला निर्णय कर्मचार्‍यांच्या बाजूने दिला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading