#मुंबई

Showing of 28289 - 28302 from 31026 results
म्हाडाचे 10 हजार 777 अर्ज बाद

बातम्याMay 10, 2010

म्हाडाचे 10 हजार 777 अर्ज बाद

10 मे म्हाडाच्या घरांसाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी 10 हजार 777 अर्ज बाद झाले आहेत. एकूण 3 लाख 28 हजार 483 अर्ज आले होते. म्हाडाच्या 3 हजार 449 घरांसाठी 18 मे रोजी सोडत निघणार आहे. ही सोडत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. या सोडतीमध्ये येण्यासाठी अर्जदारांना एन्ट्री पासेस घ्यावे लागणार आहेत. हे पासेस वांद्रे येथील म्हाडाच्या ऑफिसमध्ये 14 तारखेला सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत देण्यात येणार आहेत. हे पास 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' या तत्त्वावर वाटण्यात येणार आहेत. एकावेळी सभागृहामध्ये 600 लोक बसू शकतील एवढी आसनक्षमता असल्यामुळे पासेस मर्यादित आहेत. त्याचबरोबर रंगशारदा सभागृहाच्या समोरच्या मैदानात मोठ्या स्क्रीन लावण्यात येणार आहे. आसन मिळालेल्या अर्जदारांना सभागृहातील सोडतीचे लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळणार आहे.