मुंबई विमानतळ

Showing of 66 - 68 from 68 results
विमानतळ नवी मुंबईतच !

बातम्याOct 26, 2010

विमानतळ नवी मुंबईतच !

26 ऑक्टोबर नवी मुंबई विमानतळ प्रस्तावित जागेवरच होणार आहे. दोन रनवेज होऊ शकतील, अशी फक्त नवी मुंबई ही एकच जागा आहे, त्यामुळे या जागेचा सकारात्मक विचार झाला आणि यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांची आज बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे रमेश आणि पटेल यांनी बैठक संपल्यानंतर स्पष्ट केले. पण ही अंतिम बैठक नसून एन्व्हार्यमेंट ऍक्शन कमिटी 9 आणि 10 नोव्हेंबरला बैठक घेणार आहे. त्यानंतर 10 नोव्हेंबरलाच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. आजची बैठक सकारात्मक झाली आणि पर्यावरणाच्या संबंधी मुद्द्यांवर 70 टक्के समाधान झाल्याचंही जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. चार महत्वाचे मुद्देगाढी नदीचा प्रवाह बदलला जाणार नाहीमात्र उलवे नदीचा प्रवाह बदलला जाणार की नाही, यावरचा निर्णय प्रलंबित आहे.डोंगरांचा प्रश्नही निकालात निघालाचांगल्या दर्जाचे मॅनग्रोव्हज जतन केले जातील

ताज्या बातम्या