मारहाण

Showing of 2731 - 2744 from 2853 results
शिवसैनिकांकडून प्रेस फोटोग्राफर्सना मारहाण

बातम्याJun 18, 2010

शिवसैनिकांकडून प्रेस फोटोग्राफर्सना मारहाण

18 जूनऔरंगाबाद इथे शिवसैनिकांनी प्रेस फोटोग्राफर्सना मारहाण केली आहे. शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार्‍या रास्ता रोकोचे वार्तांकन करताना शिवसैनिकांनी ही मारहाण केली. मृत्यूचा सापळा बनलेल्या औरंगाबादच्या छावणी ते गोलवाडी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या मागणीसाठी शिवसेनेने गोलवाडी इथे रास्ता रोको आंदोलन करून मुंडन आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी एका गाडीवर दडफेक केली. त्याचवेळी त्यांनी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना धकाबुक्की केली. 'दैनिक सकाळ'चे छायाचित्रकार चंद्रकांत थोटे आणि 'दैनिक लोकाशा'चे छायाचित्रकार मंगेश शिंदे यांनादेखील यावेळी मारहाण करण्यात आली. औरंगाबादचे 'आयबीएन -लोकमत'चे व्हिडिओ जर्नालिस्ट सुधीर जाधव यांनाही मारहाण झाली. लष्कराच्या ताब्यात असलेली जागा रस्ता रुंदीकरणासाठी मिळत नसल्याने छावणी ते गोलवाडीपर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड रहदारी असते. या ठिकाणी दररोज अपघात होतात. यामध्ये कित्येकांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. तर शेकडो जण जखमी झालेत. संरक्षण मंत्रालयाने रस्ता रुंदीकरणासाठी त्वरीत परवानगी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.