मातोश्री

Showing of 495 - 508 from 528 results
नाशिकमध्ये महापौर महायुतीचाच; मुनगंटीवारांचा पुन्हा दावा

बातम्याFeb 28, 2012

नाशिकमध्ये महापौर महायुतीचाच; मुनगंटीवारांचा पुन्हा दावा

28 फेब्रुवारीनाशिकमध्ये महायुतीचाच महापौर असेल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. 'मातोश्री'वर आज महायुतीची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी महायुतीचा महापौर असणार याचा दावा केला आहे. मात्र नाशिकमध्ये मनसे किंवा राष्ट्रवादीचा आधार घेणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं. नाशिक महानगरपालिकेत नियमांचा आधार घेत महापौरपद पटकावणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले आहे. बहुमत नसतानाही महापौरपद मिळवण्यासाठी युतीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण नाशिकमध्ये महापौर ठरण्यासाठी कोणता फॉर्म्युला अवलंबणार हे गुपित आहे. महापौर झाल्यावर उघड करु, असंही महायुतीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नाशिकमधील बलाबल - महायुती - 36- आघाडी - 35 - मनसे- 40 - जनसुराज्य - 02 - सीपीएम- 03 - अपक्ष - 06