#मातोश्री

Showing of 482 - 495 from 527 results
'मातोश्री'बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

बातम्याNov 15, 2012

'मातोश्री'बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

15 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. बाळासाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेपोटी हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमा झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर थोडीफार गर्दी ओसरली आहे. पण काही शिवसैनिक अजूनही ठाण मांडून आहे. बाळासाहेबांची प्रकृती ठीक व्हावी यासाठी सगळे जण प्रार्थना करत आहे. खबरदारी म्हणून 'मातोश्री'बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्याही इथं तैनात करण्यात आल्या आहेत. तर शीघ्र कृती दलाचे जवानही इथं तैनात करण्यात आले आहे. सर्व पोलिसांच्या सुट्‌ट्याही रद्द करण्यात आल्या आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेसह कुटुंब रात्रीपासून 'मातोश्री'वर हजर आहे. अनेक दिग्गज नेते आणि बॉलीवूडचे कलाकार मातोश्रीवर दाखल होतं आहे.'मातोश्री'वरून थेट लाईव्ह कव्हरेज पाहा -आयबीएन लोकमत आणि आयबीएन 7 वर