Elec-widget

#मातोश्री

Showing of 443 - 456 from 505 results
बाळासाहेबांना आज अखेरचा निरोप

बातम्याNov 18, 2012

बाळासाहेबांना आज अखेरचा निरोप

18 नोव्हेंबरआज सुर्याची किरण पृथ्वीतलावर येऊन पोहचतील. पण आजही किरण निस्तेज असणार आहे .गेली पाच दशक ज्या झंझावाताने मराठी मनावर गारुड केलं..अधिराज्य गाजवलं,अनेकांना घडवलं तो सुर्यपुत्र निजला आहे. बाळ केशव ठाकरे नावाचं वादळ शमलं आहे. महाराष्ट्राच्या या लाडक्यानेत्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोकाकुळ पसरलंय. कालची रात्र जणू एक वाईट स्वप्नासारखीच होती. 'आपलं दैवत आपल्याला पोरक करून गेली यावर विश्वास बसणं काही काळ कठीणच', 'साहेब, पुन्हा जन्म घ्या' अशी आर्त हाक सच्चा भक्तांची. बाळासाहेब गेल्या आठवडाभर आजाराशी योद्‌ध्या सारखे लढले. आता बाळासाहेब यमराजालाही परतवून लावतील अशी आशा भाबड्या भक्तांनी केली. पण काळाच्या मनात काही वेगळंच होतं. गेल्या चार दिवसांपासून मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांसाठी शनिवारची संध्याकाळ 'काळी संध्याकाळ' ठरली. डॉ.जलील पारकर यांनी जडअंतकराने येऊन साहेब गेले, ते योद्धासारखे लढले अशी घोषणा करताच शिवसैनिकांवर दुखाचा डोंगर कोसळला. क्षणाधार्थ अश्रू आणि हुदक्यांनी वातावरण स्तब्ध केलं. अख्खा महाराष्ट्र दुखाच्या काळोखात बुडाला. संपुर्ण महाराष्ट्रात शुकशुकाट पसरला. आज या लाडक्या नेत्याला अखेरचा 'जय महाराष्ट्र' देण्यासाठी 'शिवतीर्था'वर शिवसैनिक दाखल होतं आहेत. बाळासाहेबांचे पार्थिव मातोश्रीवरून शिवाजी पार्ककडे नेण्यात येईल. सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाळासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा - सकाळी 7 वाजता मातोश्री येथून शिवाजी पार्ककडे रवाना - सकाळी 9 वाजता शिवाजी पार्क येथे जनतेला अंतिम दर्शनासाठी - सायंकाळी 5 पर्यंत अंतिम दर्शन- सायंकाळी 6 वाजता मंत्राग्नी ( अंत्यसंस्कार) - अंतिम दर्शनासाठी शिवाजी पार्क येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे पुतळा,समर्थ व्यायाम मंदिर येथील प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येईल - महिलांसाठी समर्थ व्यायाम मंदिर येथून वेगळ्या लाईनची व्यवस्था करण्यात आली आहे- उद्यान गणेश येथील प्रवेशद्वारातून बाळासाहेब ठाकरे यांचे कुटुंबिय, शिवसेना नेते, विविध पक्षांचे नेते,मान्यवर मंडळी ह्यांना प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे. मान्यवरांच्या गाड्या पार्किंगची व्यवस्था वीर सावरकर मार्गावर करण्यात आली आहे- प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी उद्यान गणेश येथून प्रवेश व्यवस्था करण्यात आली आहे- इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासाठी स्टेज उभारण्यात आले असून तसेच ओबी व्हॅन शिवाजी पार्क मैदानासमोरील बाल क्रीडा भवन येथे पार्क करण्यात याव्यात - मुंबई ,ठाणे येथील शिवसैनिकांनी तसेच शिवसेनाप्रमुखांच्या चाहत्यांनी महायात्रेला उपस्थित राहण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा- खाजगी बस व मोठ्या वाहनाने येणार्‍या शिवसैनिकांनी आपली वाहने वाहतूक पोलीस विभागाने सूचित केल्याप्रमाणे सेनापती बापट मार्गावर पार्क करावीत