#माणसं

Showing of 53 - 66 from 99 results
राणेंनी आरोप सिध्द केले तर राजकारण सोडेन - अजितदादा

बातम्याFeb 1, 2012

राणेंनी आरोप सिध्द केले तर राजकारण सोडेन - अजितदादा

01 जानेवारीउद्योगमंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ल्यातील दंगल आम्ही घडवली असा आरोप केला आहे पण राणेंनी केलेले आरोप सिध्द करुन दाखवावे जर आरोप सिध्द झाले तर मी आणि आर.आर.पाटील दोघ मिळून राजकारण सोडून देऊ आणि जर आरोप सिध्द झाले नाही तर नारायण राणे यांनी राजकारण सोडावे असे जाहीर आव्हान अजित पवार यांनी केले. काल नारायण राणे यांची प्रसिध्दीझोतात आलेली 'वस्त्रहरण'सभा कुडाळ्यात पार पडली. राणेंनी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि आर.आर.पाटील यांना लक्ष करत राजकीय वस्त्रहरण केलं. यावेळी वेंगुर्ल्यातली दंगल राष्ट्रवादी काँग्रेसनंच घडवली असा थेट आरोप नारायण राणेंनी केला. बाटल्या दगड हेच लोक फेकत होती कारस्थान यांचेच होते आणि यात माणसं मुंबईची वापरली त्यात पोलिसांना फोन लावणारी माणसही यांचीच होती आर.आर.पाटील यांचे नाव घेत राणेंनी टीका केली. राणे यांच्या आरोपाचा समाचार घेत आज दुपारी अहमदनगरमध्ये अजितदादांनी राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे त्यामुळे ते असे बोलत आहे अशी प्रतिक्रिया दिला. पण संध्याकाळी झाले सभेनंतर माध्यमांशी बोलताना थेट राणे यांना आव्हान दिलं. वेंगुर्ल्याची दंगल आम्ही घडवली असा आरोप केला आहे पण राणेंनी केलेले आरोप सिध्द करुन दाखवावे जर आरोप सिध्द झाले तर मी आणि आर.आर.पाटील दोघ मिळून राजकारण सोडू देऊ आणि जर आरोप सिध्द झाले नाही तर नारायण राणे यांनी राजकारण सोडावे असे जाहीर आव्हान अजितदादा यांनी केले. आघाडीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावरमात्र, नारायण राणे यांनी अजित पवारांवर केलेल्या या घणाघाती आरोपांनी सरकारमधील दोन पक्षांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पण पहिल्यांदाच.. एका कॅबिनेट मंत्र्याने दुस-या मंत्र्यावर एवढे गंभीर आरोप केलेत. राणेंच्या या टीकेला अजितदादांनी आणि गृहमंत्र्यांनीही सडेतोड उत्तर दिलंय.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आक्रमक फोडाफोडीला काँग्रेसचे नेते आधीच वैतागलेत. त्यामुळे एरवी राणेंनाच समज देणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी मात्र त्यांची पाठराखण केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सुरु असलेल्या चिखलफेकीमुळे विरोधकांना आनंद झाला नाही तरच नवल. सरकारमधील दोन पक्ष एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात दंग आहेत. पण राज्यभरात कायदा सुव्यवस्थेचं वस्त्रहण होतंय, त्याकडे मात्र लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही.