#माणसं

Showing of 40 - 53 from 99 results
राहिले दूर गाव माझे

May 13, 2013

राहिले दूर गाव माझे

आज बरोबर चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे 1971-72 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. त्यावेळी पाठीवर संसार टाकून हे दुष्काळग्रस्तांनी मुंबई गाठली आणि इथल्या झोपडपट्टांमध्ये येऊन स्थिरावले. 72 च्या भीषण दुष्काळात लाखो कुटुंब देशोधडीला लागली. जीवाच्या आकांतानं ही माणसं घरदार सोडून लेकरांना पोटाशी धरून शहरांच्या आसर्‍याला आली. मुंबईच्या या नाक्यांनी त्यांना भाकरी दिली. रोजगाराच्या शोधात असलेल्या नाक्यावरच्या या गर्दीत आम्हाला भेटली 72 च्या दुष्काळानंतर मराठवाड्यातून मुंबईत आलेली शेकडो माणसं...