#महिला

Showing of 1 - 14 from 531 results
मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण

महाराष्ट्रSep 14, 2019

मागे जाऊन बसायला सांगितल्याचा राग, महिला कंटक्टरला केली बेदम मारहाण

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 14 सप्टेंबर: वैजापूरहून सिरसगावला जाणाऱ्या बसमध्ये शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार घडला आहे. अंजली अशोक शेजवळ एसटीत चढली आणि तिने वाहक आशा सोनवणेला पास दाखवला. एसटीत गर्दी असल्याने वाहक आशाने अंजलीला मागे जाऊन बसण्यास सांगितले. याचा राग मनात येऊन अंजली शेजवळने वाहक आशा यांना शिवीगाळ केली. गाव येऊदे तुला बघते असंही म्हटलं. थोड्याच वेळात जांबरगाव आलं आणि एसटी थांबली. एसटी थांबातानाच अंजली शेजवळने पुन्हा वाहक आशा यांना शिव्या द्यायला सुरूवात केली. तिला समजवण्यासाठी वाहक खाली उतरली तर अंजलीने तिला थोबाडीत मारायला सुरूवात केली. अंजलीचे आई आणि भाऊही आले त्यांनीही वाहक आशा यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. वाहकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.