#महापौर

Showing of 66 - 79 from 673 results
मुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू

मुंबईDec 17, 2018

मुंबई कामगार रुग्णालय आगीचा मोठा खुलासा, या चुकीमुळे झाला 6 जणांचा मृत्यू

उदय जाधव, मुंबई, 17 डिसेंबर : अंधेरी मरोळ येथील कामगार रुग्णालयात अग्नितांडवाने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील आग आटोक्यात आली आहे. पण जेव्हा आमचे प्रतिनिधी रुग्णालयात गेले तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. रुग्णालयात आग विझवण्यासाठी अग्निरोधक यंत्र आणून ठेवले आहे. परंतु, ते कुठेही लावण्यात नसल्याचं समोर आलं आहे. सर्व नवीन अग्निरोधक यंत्रणा जशाच तशाच ठेवण्यात आल्या आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 109 जणांचा सुखरुप वाचवण्यात आलं आहे. रुग्णालयातील रुग्णांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. शाॅर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

Live TV

News18 Lokmat
close