News18 Lokmat

#महापालिका

Showing of 1483 - 1496 from 1764 results
बेळगाव महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

बातम्याNov 23, 2011

बेळगाव महापालिकेला कारणे दाखवा नोटीस

23 नोव्हेंबरबेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा घाट घातला जात आहे. बेळगाव महापालिकेला कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कर्नाटक सरकारमधील नगरविकास मंत्री सुरेशकुमार यांनी ही नोटीस बजावली. दोन आठवड्याच्या आत या नोटीसीचे उत्तर देणे हे बेळगाव महानगरपालिकेसाठी बंधणकारक आहे.विकास कामे संथ गतीने झाल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने ही नोटीस बजावली. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमात महापौर आणि उपमहापौरांनी हजेरी लावली होती आणि त्यामुळे बेळगाव महापालिकेला ही नोटीस बजावली गेली अशी चर्चा होतेय. कन्नड संघटनांच्या दबावामुळे ही नोटीस बजावली गेली. कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड रक्षणवेदीकेच्या कार्यकर्त्यांनी केलं प्रतिकृतीचं दहन, बेळगाव महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली.