#महानगरपालिका

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

बातम्याAug 18, 2019

VIDEO: पाणीपुरीत सापडल्या जिवंत अळ्या, पोलखोल होताच विक्रेता फरार!

अहमदनगर, 18 ऑगस्ट : तुम्ही रस्त्यावर पाणी-पुरी खात असाल तर सावधान. कराण नगरमध्ये नेप्ती नाका चौकातील एका ठेल्यावर पाणीपुरीत जिंवत अळ्या अढळून आल्या आहेत. पाणीपुरीच्या या ठेल्यावर काही तरुणांना पाणीपुरी खाताना त्यामध्ये चक्क जिवंत अळ्या अढळून आल्या. या तरुणांनी ही बाब पाणीपुरीवाल्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्याने माफी मागत हे पाणी तीन दिवसांपूर्वीचे असल्याचं कबूल केलं. त्याने रस्त्यावरचं ठेला सोडून तिथून धूम ठोकली. स्वच्छतेची कोणतीही काळजी न घेता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात कडक कारवाई होणं गरजेचं आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि अन्न-औषध विभागाने शहरातील पाणीपुरीसह विविध खाद्य पदार्थांच्या गाड्यावरील खाद्य तपासून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.