महानगरपालिका

Showing of 352 - 365 from 453 results
क्लिन नागपूरसाठी, क्लिक फेसबुक !

बातम्याNov 13, 2011

क्लिन नागपूरसाठी, क्लिक फेसबुक !

अखिलेश गणवीर, नागपूर13 नोव्हेंबरनागपूर शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने नवीन हायटेक पद्धतीचा वापर सुरु केला आहे. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्याची किमया साधण्याचा प्रयत्न पालिकेने चालवला आहेनागपूरच्या विश्वकर्मा नगर भागात राहणारे झानेश्वर रक्षक..त्यांच्या भागात साचलेल्या कचर्‍यामुळे चिंतीत होते. लेखी तक्रारीनंतरही उपयोग झाला नाही. अखेर फेसबुकवर त्यांनी तक्रार दाखल केली. आणि या तक्रारीची दखल घेत 24 तासाच्या आत पालिकेनं कचरा साफ केला. कचर्‍यासंदर्भातील तक्रारी नोंदवून घेण्यासाठी पालिकेने फेसबुकचा वापर केला. यासाठी एक पेज तयार करण्यात आलं आहे. 12 तासाच्या आत कारवाईची हमी पालिकेने दिली. कचरा उचलण्याच्या कामात पारदर्शकता राहावी, कचर्‍यांच्या संदर्भात जनजागृतीचा उद्देश यामागे असल्याचे पालिकेचं म्हणणं आहे. महापालिकेचा हा हायटेक मार्ग किती यशस्वी होतो. हा तर येणारा काळच सांगेल. मात्र या मार्गाचा वापर करणारी नागपूर महानगरपालिका पहिलीच महापालिका ठरली आहे.