#महादेव जानकर

Showing of 53 - 66 from 273 results
VIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण?

व्हिडिओMar 23, 2019

VIDEO : फडणवीसांकडून घटकपक्षांची मनधरणी की बोळवण?

23 मार्च : भाजपनं मित्रपक्षांना विधानसभेवेळी जागा देण्याचं आश्वासन देऊन बोळवण केलीय का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण, शिवसेना-भाजप युतीकडून घटकपक्षांना लोकसभेच्या एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्यानं मित्रपक्षांकडून नाराजीचा सूर उमटत होता. मात्र, आता अखेर या सर्व मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आले आहे. मात्र, लोकसभेसाठी मित्रपक्षांनी साथ द्यावी, विधानसभेच्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांना न्याय देईल आणि सन्मान जनक जागा देईल असं आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आले आहे. त्यामुळे रामदास आठवले, महादेव जानकर आणि विनायक मेटेंना ही अट मान्य झाल्याचं समोर येत आहे.