मुंबई, 27 सप्टेंबर: पंजाब आणि महराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) खातेदारांना आता 10 हजार रुपये काढण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली आहे. यापूर्वी केवळ एक हजार रुपयेच बँकेतून काढता येत होते. व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने दोन दिवसांपूर्वी आरबीआयने या बँकेवर काही निर्बंध घातले आहेत. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.