Elec-widget

#मल्टिप्लेक्स

Showing of 27 - 39 from 39 results
'आरक्षण' ला गृहखात्याचे 'रक्षण'; कोल्हापुरात बंदची हाक

बातम्याAug 8, 2011

'आरक्षण' ला गृहखात्याचे 'रक्षण'; कोल्हापुरात बंदची हाक

08 ऑगस्टप्रकाश झा यांचा आरक्षण या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचं वाद सुरु झाले आहेत. येत्या शुक्रवारी आरक्षण सिनेमा प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण सज्ज असल्याचे गृहखात्याने मुंबई हायकोर्टाला कळवले आहे. त्याच बरोबर प्रदर्शनापूर्वी चित्रपटाचे स्क्रीनिंग दाखवावे अशी मागणी आपण निर्मात्याना करणार असल्याचंही गृहखात्याने कळवले. पण एकीकडे गृहखात्याने अशी ग्वाही दिली असताना कोल्हापूरमध्ये पोलिसांनीच थिएटर मालकांना पत्रं लिहून आरक्षण सिनेमा न दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. या चित्रपटामुळे दलितांच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा आशयाचे पत्र पोलिसांनी शहरातल्या पार्वती मल्टिप्लेक्स आणि अयोध्या टॉकीज या दोन थिएटर मालकांना लिहीले आहे.तर आज पुन्हा मुंबईत चित्रपटाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. भायखळा परिसरात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आरक्षणच्या पोस्टर्सला काळं फासलं आणि पोस्टर्स फाडण्याचा प्रयत्न केला.